सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
त्यांचे गायक, व ती गीते कोणाच्या तोंडी आहेत याची ताहिती. (गीतकार: ग. दि. माडगूळकर, संगीतकार : सुधीर फडके)
१) स्वंये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती (निवेदक ) सुधीर फडके, ललिता फडके, माणिक वर्मा
२) शरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी ( लव - कुश ) मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई
३) उगा कां काळीज माझे उले ? पाहुनी वेलीवरची फुले ( कौसल्या ) ललिता फडके
४) उदास कां तू ? आवर वेडे नयनातील पाणी ( दशरथ ) बबनराव नावडीकर
५ ) दशरथा, घे हे पायसदान ( यज्ञपुरुष ) सुधीर फडके
६) चैत्रमास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी ( अयोध्येतील स्त्रिया) सुमन कल्याणपुरकर, कालिंदी केसकर, उषा अत्रे, जानकी अय्यर, गौरी अय्यर, व आशा भोसले
७) सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो ( कौसल्या )ललिता फडके
८) ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ( विश्वामित्र ऋषी ) राम फाटक
९ ) जोड झणि कार्मुका, सोड रे सायका ( विश्वामित्र ऋषी ) राम फाटक
१० ) चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला (आश्रमवासी लोक ) चंद्रकांत गोखले
११) रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले(अहिल्या) मालती पांडे
१२ ) आकाशाची जडले नाते धरणी मातेचे ( भाट चारण ) सुधीर फडके
१३ ) आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती ( उर्मिला, मांडवी व श्रुतकीर्ती ) मालती पांडे, सुमन कल्याणपुरकर, कालिंदी केसकर.
१४ ) मोडू नका वचनास - नाथा - मोडू नका वचनास( कैकेयी ) कुमुदिनी पेडणेकर
१५ ) उंबरठ्यासह ओलांडूनिया मातेची माया ( कौसल्या) ललिता फडके
१६) रामाविण राज्यपदी कोण बसतो? ( लक्ष्मण) सुरेश हळदणकर
१७) निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. (सीता) माणिक वर्मा
१८) राम चालले तो तर सत्पथ ( अयोध्या वासी) मालती पांडे, गजाननराव वाटवे , व कोरस
१९ ) नकोस नौके परत फिरू ग ( गृह आणि नावाडी ) सुधीर फडके, कुमुद पेडणेकर, आशा भोसले, सुमन कल्याणपुर , कालिंदी केसकर.
२०) या इथे लक्ष्मणा बांध कुटी ( राम) सुधीर फडके
२१) शेवटी करिता नम्र प्रणाम ( सुमंत ) गजानन वाटवे
२२) दाटला चोहीकडे अंधार ( दशरथ राजा) सुधीर फडके
२३) माता न तू , वैरिणी (भरत) वसंतराव देशपांडे
२४) आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा ( लक्ष्मण ) सुरेश हळदणकर
२५ ) दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा (राम) सुधीर फडके
२६) तात गेले ,माय गेली, भरत आता पोरका (भरत) वसंतराव देशपांडे
२७ ) कोण तू ,कुठला राजकुमार ? ( शूर्पणखा ) मालती पांडे
२८ ) विरूप झाली शूर्पणखा, सूड घे त्याचा लंकापती ( शूर्पणखा) योगिनी जोगळेकर
२९ ) तोडिता फुले मी सहज पाहिला जाता ( सीता ) माणिक वर्मा
३० ) याचका, थांबू नको दारात (सीता) माणिक वर्मा
३१ ) उजाड आश्रम पुरे काननी, (श्रीराम) सुधीर फडके
३२) ही तिच्या वेणीतील फुले (राम) सुधीर फडके
३३) मरणोन्मुख त्याला का रे मारिसी पुन्हा रघुनाथा (जटायू) राम फाटक
३४) धन्य मी शबरी श्रीरामा (शबरी) मालती पांडे
३५) साक्षीस व्योम, पृथ्वी (सुग्रीव) वि.ल. इनामदार
३६) मी धर्माचे केले पालन (श्रीराम) सुधीर फडके
३७) तरुन जो जाईल सिंधू महान (जांबुवान) वसंतराव देशपांडे
३८) हीच ती रामाची स्वामिनी (हनुमान) वि.ल. इनामदार
३९) नको करूस वल्गना रावणा (सीता) माणिक वर्मा
४०) मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची (सीता) माणिक वर्मा
४१) लीलया उडूनी गगनात पेटवी लंका हनुमंत (लव आणि कुश) मंदाकिनी पांडे व प्रमोदिनी देसाई
४२) बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरी (वानरगण) सुधीर फडके, व कोरस
४३) काय ऐकते ? काय पाहते ?( सीता) माणिक वर्मा
४४) सुग्रीवा हे साहस असले (श्रीराम) सुधीर फडके
४५) जा, झणि जा, रावणा सांग अंगदा (राम) सुधीर फडके
४६) नभा भेदूनी नाद चालले शंख ( लव आणि कुश ) मंदाकिनी पांडे व प्रमोदिनी देसाई
४७) योग्य समयि जागविले बांधवा मला (कुंभकर्ण) वि.ल. इनामदार
४८) आज का निष्फल होती बाण ? (श्रीराम) सुधीर फडके
४९) देवहो, बघा रामलीला भूवरी रावण वध झाला ( गंधर्व आणि अप्सरा ) सुधीर फडके व कोरस
५०) किती यत्ने मी पुन्हा पाहिली तूते ( राम ) सुधीर फडके
५१) लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची (राम ). सुधीर फडके
५२) त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार (अयोध्यावासी) सुधीर फडके व कोरस
५३) प्रभू मज एकच वर द्यावा (हनुमान) राम फाटक
५४) ओठात थांबूनी सशब्द आशा लाजे (सीता) माणिक वर्मा
५५) मजेत सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ?( सीता) लता मंगेशकर
५६) रघुराजाच्या नगरी जाऊन (वाल्मिकी) सुधीर फडके ,