सुधीर फडके
सुधीर फडके
शब्द आणि भावनांना सुरांची साथ देत अजरामर सुगमसंगीताची निर्मिती करणारा स्वरगंधर्व
बाबूजींना त्यांच्या आयुष्यात अनेक पुरस्कार, व मानसन्मान मिळाले. त्यातले काही महत्त्वाचे :
१ ) १९६३ पासून ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव’ साजरा केला जातो. त्यात बाबूजींना उत्कृष्ट संगीतासाठी गौरविण्यात आले .
२ ) १९६३ मध्ये ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाला राष्ट्रपती पदक प्राप्त झाले.
३ ) ‘प्रपंच’,’ संथ वाहते कृष्णामाई’ , ‘आम्ही जातो आमच्या गावा’, ‘धाकटी बहीण’, ‘कार्तिकी’ व ‘या सुखांनो या’ , या चित्रपटातील त्यांनी गायलेल्या गीतांसाठी एकूण सहा वेळा त्यांना ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक’ म्हणून गौरविण्यात आले .
४ ) ‘प्रपंच‘, आणि ‘आम्ही जातो आमच्या गावा’ या चित्रपटांसाठी त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीतासाठी ‘सर्वोत्कृष्ट संगीतकार’ म्हणून त्यांचा दोन वेळा सन्मान केला गेला.
५ ) १९६८ मध्ये ‘भाभी की चुडिया’ या हिंदी चित्रपटासाठी संगीत दिल्यामुळे त्यांना ‘सुर-सिंगार’तर्फे पुरस्कार देण्यात आला.
६ ) ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट १९७० साली प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटासाठी ’सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून त्यांना ‘स्वामी हरिदास पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
७ ) १९९६ मध्ये ‘व्ही शांताराम यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारे पारितोषिक’ त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आले.
८ ) १९९६ मध्ये ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ तर्फे संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा ‘गोदावरी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
९ ) ‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
१०) १९९८ साली दीनानाथांच्या पुण्यतिथीनिमित्त - आशा भोसले यांच्या हस्ते ‘स्मृतिचिन्ह’ , व ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन बाबूजींचा सत्कार करण्यात आला.
११ ) २००१ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ दिला गेला. याच वर्षी त्यांना ‘अल्फा जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला .
१२ ) २००२ - ‘सह्याद्री स्वर-रत्न पुरस्कार’ देऊन बाबूजींचा सत्कार केला गेला
१३ ) त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने बोरीवली आणि दहिसर या भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला ‘सुधीर फडके उड्डाण-पूल’ असे नाव दिले